नवी दिल्ली : दिल्लीत होळीच्या दिवशी जपानी मुलीचा विनयभंग करणा-या ३ मुलांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील एक मुलगा अल्पवयीन आहे. आरोपींनी आपली चूक मान्य केली आहे. पहाडगंज येथे राहत असलेली जपानी तरुणी भारत सोडून बांगला देशात गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी असेही सांगितले की त्यांनी जपानी दूतावासाला पत्र लिहून मुलीची ओळख पटविण्यासाठी मदत मागितली होती, परंतु दूतावासाने सांगितले की, त्यांना अशा कोणत्याही घटनेची माहिती नाही. उपपोलिस आयुक्त संजय कुमार सैन यांनी सांगितले की, व्हीडीओचे विश्लेषण करून योग्य माहिती मिळवली जात आहे.