27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयफाशीची शिक्षा झालेल्या कैद्याला दहावीत ६४ टक्के गुण

फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याला दहावीत ६४ टक्के गुण

एकमत ऑनलाईन

लखनौ : न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेल्या कैद्याने दहावीची परीक्षा दिली असून, अलीकडेच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात त्याला ६४ टक्के गुण मिळाले आहेत. मनोज असे या कैद्याचे नाव आहे. उत्तर प्रदेश मधील शाहजहांपूरच्या न्यायालयाने मनोज याला फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या कैद्याने यूपी बोर्ड हायस्कूलची परीक्षा दिली होती. त्यात तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला आहे.

शहाजहानपूर कारागृहाचे अधीक्षक बी.डी. पांडे यांनी सांगितले की, एका पाच वर्षांच्या निष्पाप मुलाच्या हत्येप्रकरणी जिल्हा न्यायालयाने मनोज नावाच्या व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतरही मनोजने तुरुंगातूनच शिक्षण घेत हायस्कूलची परीक्षा दिली. त्यामध्ये तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.

उत्तर प्रदेश माध्यमिक शिक्षण मंडळाच्या हायस्कूल परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला. कारागृह अधीक्षकांनी सांगितले की, कैदी मनोज यादव हा पोलीस स्टेशन कलान परिसरातील रहिवासी असून त्याने २८ जानेवारी २०१५ रोजी अनमोल या पाच वर्षांच्या चिमुरड्याला गोळ्या घालून ठार मारल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्याला २४ नोव्हेंबर २०२१ रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या