30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home राष्ट्रीय एलआयसी, आयडीबीआयसह विविध कंपन्यांचे खाजगीकरण

एलआयसी, आयडीबीआयसह विविध कंपन्यांचे खाजगीकरण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सर्वांत मोठी विमा कंपनी-भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) प्रारंभिक खुल्या भागविक्रीद्वारा (आयपीओ) निर्गुंतवणूक करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. यावेळी त्यांनी भारत सरकार निर्गुंतवणुकीकरण करणा-या कंपन्यासंदर्भात माहिती दिली. त्यावेळी त्यांनी एलआयसीचा आयपीओ यंदाच्या वर्षी बाजारामध्ये येईल, असे स्पष्ट केले. यासोबतच आयडीबीआय बँकेचे खासगीकरण करण्यासंदर्भातील घोषणाही निर्मला सीतारामन यांनी केली.

दोन बँका आणि एक आयुर्विमा कंपनीमधील निर्गुंतवणूक सरकारकडून केली जाणार आहे. एलआयसीचा आयपीओ यंदा बाजारात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. एलआयसी आणि आयडीबीआयमधील निर्गुंतवणुकीकरण करून सरकार ९० हजार कोटी रुपये उभे करण्याचा उद्देश सरकारने समोर ठेवल्याचे सीतारामन यांनी २०२० चा अर्थसंकल्प सादर करताना केली होती. त्याचबरोबर इतर निर्गुंतवणूकीकरणाच्या माध्यमातून १.२ लाख कोटी सरकार उभे करणार असल्याचेही निर्मला यांनी स्पष्ट केले होते. गेल्या वर्षी निर्गुंतवणुकीतून २.१ लाख कोटी रुपये उभे करण्याचे उद्दिष्ट असल्याचे अर्थमंत्र्यांनी जाहीर केले होते. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात प्राथमिक विक्रीद्वारे एलआयसीमधील सरकारी भागभांडवलाची अंशत: विक्री करण्याची घोषणा केली होती. या वर्षी या विक्रीला सुरुवात होणार असल्याचे सांगितले.

एलआयसीच्या भाग विक्रीतून १ लाख कोटी उभारणार
आयुर्विमा क्षेत्रातील एलआयसी सध्या १०० टक्के सरकारी मालकीची कंपनी आहे. एलआयसीची प्राथमिक विक्री भारतीय भांडवली बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी प्राथमिक विक्री ठरण्याची शक्यता आहे. सरकार ८ ते १० टक्क्क्यांदरम्यान निर्गुंतवणूक करून ९० हजार ते १ लाख कोटीचा निधी उभारण्याची शक्यता आहे.

या कंपन्यांमध्येही निर्गुंतवणूक
केंद्र सरकारने विविध कंपन्यांच्या खाजगीकरणातून मोठ्या प्रमाणात पैसे उभे करण्याचे ठरविले असून, त्यानुसार बीपीसीएल, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि एअर इंडिया या कंपन्यामध्ये यंदाच्या वर्षात निर्गुंतवणूक करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

चाहत्यांसाठी खुश खबर; आयपीएलचे सामने महाराष्ट्रात होणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या