मुंबई : बॉलीवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा कायमच चर्चेत असते. प्रियंकाने सुरू केलेला नवा होम डेकोर ब्रँड. त्याचे नाव ‘सोना होम’असून यामध्ये टेबल लिनेन, टेबल क्लॉथ, डिनर सेट, कप यासारख्या गृहउपयोगी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. या ब्रँडच्या किमती पाहून चाहत्यांनी तिला पुन्हा ट्रोल केले आहे.
हे कलेक्शन तिनं २२ जून २०२२ रोजी लाँच केलं. प्रियंकाने ‘सोना’ नावाने परदेशात हॉटेलही सुरू केलं आहे. तिचा नवा ब्रँड तिने तरुण उद्योगपती मनीष गोयल याच्यासोबत सुरू केला आहे. पण हा नवा ब्रँड प्रियंकाला चांगलाच महागात पडला आहे. कारण तिच्या ‘सोना होम’ कलेक्शनमधील वस्तूंच्या किंमती ऐकून सामान्य माणसांना नक्कीच धडकी भरेल. त्यामुळे चाहते तिला आता ट्रोल करत आहेत.
प्रियांकाच्या ‘सोना होम’ मध्ये चहाच्या कपची किंमत ३, ४७१ रुपये आहे तर बशीची किंमत ५, ३६५ रुपये आहे. टेबल क्लॉथची किंमत ही ३०, ६१२ तर टेबल रनरची किंमत १४ हजार रुपये आहे. या सर्व किमती डॉलर मध्ये देण्यात आल्या आहेत. या किमती पाहून आता ट्रोलर्सला उधाण आले आहे.