हैदराबाद : पीएम मोदींच्या सुरक्षेत हलगर्जीपणाचे प्रकरण समोर आले. विजयवाडामध्ये पीएम मोदींच्या हेलिकॉप्टरसमोर काही काळे फुगे आले. मात्र, वैमानिकाने आपल्या हुशारीने परिस्थिती हाताळली.
मीडिया रिपोर्टनुसार हे काळे फुगे काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोडले होते. या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी ३ जणांना अटक केली. पंतप्रधान मोदी यांचे हेलिकॉप्टर झेपावताना हा प्रकार समोर आला.