32.6 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeराष्ट्रीयप्रोव्हिडंड फंड चे व्याजदर पुन्हा एकदा घटण्याची शक्यता

प्रोव्हिडंड फंड चे व्याजदर पुन्हा एकदा घटण्याची शक्यता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून पुन्हा एकदा आर्थिक वर्ष २०२० मधील व्याजदरामध्ये  कपात केली जाऊ शकते. गुंतवणुकीवर रिटर्न घातल्यामुळे व कॅश फ्लो कमी झाल्यामुळे प्रोव्हिडंट फंडच्या व्याजदरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. व्याजदरांबाबत निर्णय घेण्यासाठी आर्थिक  विभाग, इन्व्हेस्टमेंट विभाग आणि ऑडिट कमिटी लवकरच एक बैठक घेणार आहेत.

मार्च महिन्याच्या सुरूवातीला नवीन व्याजदर 8.5 टक्क्यांची घोषणा करण्यात आली होती. मात्र अद्याप त्याकरता अर्थ मंत्रालयाची मंजूरी मिळाली नाही आहे. कामगार मंत्रालयाकडून तेव्हाच नोटिफाय केले जाईल जेव्हा अर्थ मंत्रालयाकडून मंजूरी मिळेल. कोरोनाच्या संकटकाळात कर्मचारी आणि नियोक्ते यांना मदत करण्यासाठी मार्चपासून भविष्य निर्वाह निधीशी संबंधित काही उपाययोजनांची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. प्रॉव्हिडंट फंडाचे योगदान तीन महिन्यांपासून कर्मचारी आणि नियोक्ता यांच्या मूलभूत वेतनाच्या 12% वरून 10% पर्यंत कमी केले गेले आहे.

त्याचप्रमाणे कामगार मंत्रालयाने केलेल्या निवेदनानुसार आता ईपीएफओ देशातील कोणत्याही प्रादेशिक कार्यालयात केलेले दावे निकाली काढण्यास सक्षम असेल. याअंतर्गत भविष्य निर्वाह निधी, पेन्शन, आंशिक पैसे काढणे याप्रकारचे ऑनलाईन दावे सुलभरित्या पूर्ण करता येतील. तसच निवृत्तीवेतनाचा जीवन दाखला सादर करण्यासाठी सामायिक सेवा केंद्रांचा (सीएससी) वापर EPFO करणार आहे.

पेन्शन सुरू ठेवण्यासाठी ईपीएस पेन्शनर्सना दरवर्षी लाइफ प्रूफ द्यावा लागतो. सीएससी व्यतिरिक्त ईपीएस पेन्शनधारक 135 क्षेत्रीय कार्यालये, 117 जिल्हा कार्यालये आणि पेन्शन वितरित बँकांद्वारे लाइफ प्रूफ सादर करू शकतात. कोरोना काळात नोकरदार वर्गाला प्रोव्हिडेंट फंड (PF) मधून पैसे काढण्याची सूट दिली आहे. तुमच्यासमोर पैशांचे संकट आल्यास कोरोना काळात तुम्ही 75 टक्के पैसे काढू शकता.

Read More  जयंती विशेष : राजर्षि शाहू महाराज यांचे शैक्षणिक कार्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या