24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्राइम‘पबजी’ हत्याकांड : आईच्या हत्येमागे कोण?

‘पबजी’ हत्याकांड : आईच्या हत्येमागे कोण?

एकमत ऑनलाईन

लखनौ : आई पब्जी खेळायला देत नाही याचा राग मनात ठेवून उत्तर प्रदेशातल्या राजधानी लखनौच्या एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईचा खून केला होता. खून केल्यानंतर हा मुलगा तीन ते चार दिवस आपल्या सख्ख्या बहिणीसोबत घरातच होता. त्याने आपल्या बहिणीलाही याबाबत कुणाला काही सांगितलेस तर तुझीही अशीच अवस्था करेन, अशी धमकी दिली होती.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये अल्पवयीन मुलाने आईची हत्या केल्याप्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. महिलेच्या हत्येवर तिस-या एका सदस्याची नजर होती, असे सांगण्यात येत आहे. हत्येनंतर आरोपी मुलगा दुपारी दोन वाजता स्कूटी घेऊन या हत्येवर नजर असणा-या व्यक्तीला भेटायला गेल्याचे बोलले जात आहे.

हत्येतील एकमेव प्रत्यक्षदर्शी म्हणजेच, आरोपी मुलाच्या बहिणीने हा खुलासा केला आहे. आईच्या हत्येनंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भैय्या स्कूटी घेऊन कोणालातरी भेटायला गेला असता, तिने या संपूर्ण घटनेची माहिती दिली. बहिणीने कुटुंबीयांना सांगितले की, ‘भैय्या रात्री दोन वाजता मला खोलीत बंद करून कोणालातरी भेटायला गेला होता.

कुटुंबातील एका नातेवाईकाच्या म्हणण्यानुसार, मुलामध्ये आईच्या विरोधात द्वेष भरला होता आणि वडील प्रत्येक गोष्टीत आपल्या अल्पवयीन मुलाला पाठिंबा देत असत. मुलाने चूक केली तर आई शिवीगाळ करायची, पण वडिलांनी त्याला साथ दिली. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, एका षडयंत्राखाली मुलाला पुढे आणण्यात आले आणि द्वेषातून त्याने ही संपूर्ण घटना घडवून आणली.

आईच्या हत्येमागे दुस-याचा कट
आईच्या हत्येमागे आणखी कोणाचा हात आहे, याचा लवकरच उलगडा करणार आहोत, असे नातेवाईकांनी सांगितले. याआधी आरोपी मुलाची चौकशी करणा-या उत्तर प्रदेश बाल संरक्षण आयोगाच्या पथकाने सांगितले होते की, मुलाला विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांमुळे मुलानेच आईची हत्या केली असावी, असा संशय निर्माण झाला होता. आता बाल संरक्षण आयोगाची संशोधन शाखा या प्रकरणाची चौकशी करून मुख्य आरोपी शोधणार आहे. आतापर्यंत आयोगाच्या पथकाने

चौकशीदरम्यान मुलावर हत्येचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, बाल संरक्षण आयोगाच्या सदस्या सुचिता यांच्या म्हणण्यानुसार, मुलाचा वारंवार आईवर रोष होता, त्यामुळे त्याने हे कृत्य केले असावे. विदेशी पिस्तुलातून मुलाने आईवर गोळीबार केला असून यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या