34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeराष्ट्रीयजणगणनेतील ओबीसींची आकडेवारी प्रसिद्ध करा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

जणगणनेतील ओबीसींची आकडेवारी प्रसिद्ध करा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : २०२१ च्या जनगणनेत ओबीसींची जातीनिहाय जनगणना व्हावी, हा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यंदाच्या जनगणना दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाची गणना करण्याची आणि जातीनिहाय आकडेवारी जाहीर करण्याच्या मागणीवर केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. तेलंगानाचे वकील जी. मल्लेश यादव आणि अल्ला रामकृृष्णा यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. गेल्या वर्षी १५ आॅक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने आणखी याचिकाकर्ता ंिटकू सैनी यांनी याच याचिकेवर नोटीस बजावली होती. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आता या दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांमध्ये अशी मागणी करण्यात आली आहे की, ओबीसी समाजाची आकडेवारी आणि त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा आढावा घेणे आवश्यक आहे. आवश्यक माहिती नसतानाही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय विशिष्ट जातीला लागू असलेले आरक्षण नाकारले आहे. याचिकाकर्त्यांच्या मते, घटनेतील १६ (४) या कलमांतर्गत सरकारला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाला समान वागणूक देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्याचा अधिकार आहे.

त्या आधारे ओबीसी समाजातील नागरिकांना नोकरी व उच्च शिक्षणात २७ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. परंतु, आवश्यक ती माहिती नसल्यामुळे, ओबीसी समाजासाठी स्वतंत्र व्यवस्था आवश्यक आहे की नाही हे ठरविणे तूर्तास शक्य नसल्याचेही सांगितले जात आहे. टिंकू सैनी यांच्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने केंद्रीय गृह मंत्रालय, जनगणना आयुक्त आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाला नोटीस बजावली आहे. आज जी. मल्लेश यादव आणि अल्ला रामकृष्ण यांची याचिकादेखील या खंडपीठासमोर सादर करण्यात आली. या याचिकेत गृह मंत्रालय आणि मागासवर्ग आयोग यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयालाही पक्ष नेमण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज या याचिकेवर सुनावणी दरम्यान सर्व बाजूंकडून उत्तर देण्याची मागणी केली आहे.

थंडीमुळे गॅस दरात वाढ; पेट्रोलियम मंत्र्यांचा अजब जावईशोध

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या