25.2 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeराष्ट्रीयपुलवामा येथे दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद, एक जखमी

पुलवामा येथे दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद, एक जखमी

एकमत ऑनलाईन

पुलवामा : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एक पोलिस जवान शहीद झाला. या हल्ल्यात सीआरपीएफचा आणखी एक जवान जखमी झाला आहे. हा हल्ला पुलवामाच्या पिंगलाना येथे झाला. येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त दलावर गोळीबार केला.

या दहशतवादी हल्ल्यात एक पोलिस कर्मचारी शहीद झाला असून एक सीआरपीएफ जवान जखमी झाला आहे. या भागातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाठवण्यात आले आहे. या प्रकरणाची माहिती देताना जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, परिसराची नाकेबंदी करण्यात आली आहे. तसेच काश्मीर झोन पोलिसांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली. पुलवामा येथील पिंगलना येथे दहशतवाद्यांनी पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त दलावर हल्ला केल्याचे ट्वीटमध्ये म्हटले आहे.

या हल्ल्याच्या काही तासांपूर्वी, जम्मू-काश्मीरमधील शोपियांमध्ये लष्कर तैयबाचा एक दहशतवादी पोलिसांनी चकमकीत ठार केला होता. नसीर अहमद भट असे या दहशतवाद्याचे नाव आहे. नुकत्याच झालेल्या चकमकीत तो पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक दहशतवादी घटनांमध्ये त्याचा हात असल्याचे काश्मीरचे एडीजीपी विजय कुमार यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या