24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीयगायक सिद्धू मुसेवाला हत्येचे पुणे कनेक्शन

गायक सिद्धू मुसेवाला हत्येचे पुणे कनेक्शन

एकमत ऑनलाईन

पुणे : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचे थेट महाराष्ट्र कनेक्शन समोर येत असून, या प्रकरणी पंजाब पोलिसांनी पुण्यात दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. सौरभ महाकाळ आणि संतोष जाधव अशी संशयितांचे नाव आहेत. या दोघा शार्प शूटर्सना अधिक तपासासाठी पंजाबमध्ये नेऊन कोर्टापुढे हजर केले जाणार आहे.

गायक मुसेवाला हत्या प्रकरणी पंजाब पोलिसांनी ही परस्पर कारवाई केली असून, या संदर्भात आम्हाला काहीही माहिती नाही, असे पुणे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. मात्र, मुसेवाला हत्याकांडाचे कनेक्शन पुण्याशी जोडले जात असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. सौरभ महाकाळ याला मंचर येथून, तर संतोष जाधव याला पुणे शहरातून उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.

कॅनडास्थित गँगशी संबंध
पंजाबी गायक आणि राजकारणी सिद्धू मूसेवाला यांच्या हत्येचे कनेक्शन कॅनडास्थित गँगशी असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या हत्येची जबाबदारी तिहार जेलमध्ये असलेल्या बिष्णोई या कुख्यात गुंडाने घेतली होती. मुसेवाला हे त्यांच्या गाडीने जात असताना २९ मे रोजी मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात त्यांची गोळ््या घालून हत्या केली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या