चंदीगढ : पंजाबचे मुख्यमंत्री आज गुरुवारी चंदीगढमध्ये एका खासगी समारंभात विवाहबद्ध झाले. ४८ वर्षीय भगवंत मान यांचे हे दुसरे लग्न आहे. डॉ. गुरप्रीत कौर यांच्याशी ते विवाहबद्ध झाले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या लग्नात सहभागी झाले होते. मान यांच्या पत्नी गुरप्रीत कौर यांचे कुटुंब कुरुक्षेत्र जिल्ह्यातील पेहोवा नगरातील आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव इंद्रजित सिंह आणि आईचे नाव राज कौर आहे.