27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयमुलाच्या हत्येला पंजाब सरकार जबाबदार ; मुसेवाला यांच्या आईची संतप्त प्रतिक्रिया

मुलाच्या हत्येला पंजाब सरकार जबाबदार ; मुसेवाला यांच्या आईची संतप्त प्रतिक्रिया

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सुप्रसिद्ध पंजाबी गायक तसेच काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. राजकीय क्षेत्रातूनही संताप व्यक्त केला जात आहे. असे असतानाच सिद्धू मुसेवाला यांच्या आईने आपल्या मुलाच्या मृत्यूला राज्य सरकारला जबाबदार धरले आहे.

सिद्धू मुसेवाला हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक आणि काँग्रेसचे नेते होते. त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांची २९ मे रोजी कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार याने गोळ्या झाडून हत्या केली. या गोळीबारामध्ये मुसेवाला यांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मुसेवाला यांच्या आईनेदेखील मुलाच्या मृत्यूनंतर प्रतिक्रिया व्यक्त करत पंजाब सरकारला जबाबदार धरले आहे. माझ्या मुलाला न्याय मिळायला हवा, अशी मागणी सिद्धू मुसेवाला यांची आई तसेच कुटुंबीय आणि नातेवाईकांनी केली आहे.

एकीकडे सुद्धू मुसेवाला यांच्या आईने पंजाब सरकारला जबाबदार धरले आहे. तर दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री तथा आपचे नेते भगवंत मान यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. तसेच या हत्येमध्ये सहभागी असलेल्या कोणाचीही गय केली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या