26.9 C
Latur
Monday, July 4, 2022
Homeराष्ट्रीयपंजाबी गायकाची गोळ्या झाडून हत्या

पंजाबी गायकाची गोळ्या झाडून हत्या

एकमत ऑनलाईन

चंदीगड : काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची मानसा जिल्ह्यात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. पंजाब सरकारने एक दिवस आधीच सुरक्षा काढून घेतली होती. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ््या झाडल्या. मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावाजवळ हा गोळीबार झाला. या गोळीबारात मुसेवाला गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोळीबारात आणखी दोघेजण जखमी झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या