27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयकिमान आधारभूत किमतीने तांदूळाची केंद्र सरकारकडून खरेदी

किमान आधारभूत किमतीने तांदूळाची केंद्र सरकारकडून खरेदी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : यंदाच्या खरीप हंगामाच्या खरेदीअंतर्गत केंद्र सरकारने ७० हजार कोटींहून अधिक रुपयांच्या भातपीकाची किमान आधारभूत किमतीने खरेदी केली आहे. अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिली आहे. देशभरातल्या सुमारे ४० लाख ५३ हजार शेतक-यांना याचा लाभ झाल्याचे कृषी मंत्रालयाने म्हटले आहे.

महाराष्ट्र आणि पंजाबसह १५ राज्यांमध्ये भातपिकाची खरेदी सुरु आहे. आत्तापर्यंत ३७२ लाख टन भातपिकाची खरेदी झाली असून, यापैकी २०२ लाख टन भाताची खरेदी एकट्या पंजाबमधून केली अशी माहिती कृषी मंत्रालयाने दिली आहे. सध्याच्या किमान आधारभूत किंमत योजनेनुसार सरकार शेतमालाची खरेदी सुरुच ठेवणार असल्याचेही कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

शिक्षेच्या धाकाने मुलं नियंत्रित होतात का ?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या