23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीयओवैसींना धक्का; एमआयएमचे १०० हून अधिक कार्यकर्ते राजीनामा देणार

ओवैसींना धक्का; एमआयएमचे १०० हून अधिक कार्यकर्ते राजीनामा देणार

एकमत ऑनलाईन

प्रयागराज : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी पक्षातील कार्यकर्त्यांनकडून मोठा धक्का बसणार आहे. पक्षातील अनेक कार्यकर्ते आज म्हणजेच मंगळवारी सामूहिक राजीनामा देणार आहेत. प्रयागराजमधील जिल्हा आणि शहर समितीशी संबंधित एआयएमआयएमचे सर्व कार्यकर्ते आज पक्ष सोडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

१० जून रोजी प्रयागराजमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या हिंसाचारात राज्य नेतृत्वाने हस्तक्षेप न केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे, त्यामुळे हे सर्वजण आज राजीनामा देणार असल्याचे समजते.
ओवेसींच्या पक्षाचे १०० हून अधिक कार्यकर्ते आज सामूहिक राजीनामा देणार असल्याचा दावा प्रयागराजच्या पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.

असे झाले, तर यूपीमध्ये आपला पाया भक्कम करण्याचा प्रयत्न करणा-या असदुद्दीन ओवेसी यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल. १० जून रोजी झालेल्या हिंसाचारप्रकरणी एआयएमआयएमचे जिल्हाध्यक्ष शाह आलम आणि जीशान रहमानी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतकेच नव्हे तर शाह आलम आणि सरचिटणीस झीशान रहमानी या दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आले आहे. यासोबतच या दोघांवर २५-२५ हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. शाहआलमचे समर्थक, अधिकारी आणि नेतेच राजीनामे देतील, असे सांगितले जात आहे. या प्रकरणी ज्या नेत्यांवर पक्षाकडून आरोप करण्यात आले आहेत, त्यांना कोणतीही मदत केली जात नसल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे.

मात्र, काही बडे नेते नाराज नेत्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. आज, मंगळवारी दुपारी ४ वाजता सामूहिक राजीनामा देण्याचा कार्यक्रम असल्याचे सांगण्यात येत आहे. १० जून रोजी शुक्रवारच्या नमाजानंतर अटाळा परिसरात प्रचंड गोंधळ, जाळपोळ आणि दगडफेक झाली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या