28 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home राष्ट्रीय क्वारंटाईनच्या शिक्क्यांमुळे हातांना होतायेत जखमा

क्वारंटाईनच्या शिक्क्यांमुळे हातांना होतायेत जखमा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: देशात कोरोना व्हायरसमुळे विमानातून येणा-या प्रवाशांच्या हातावर क्वारंटाइनचे शिक्के मारले जातात. पण, एका माजी खासदाराच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारल्यानंतर त्यांच्या हाताला जखम झाली आहे. हाताचे छायाचित्र त्यांनी ट्विटरवरून शेअर केले आहे. दरम्यान, खराब हवा कोरोना काळात प्राणघातक असल्याचा इशारा यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे.

काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आणि माजी खासदार मधू गौड याक्षी यांनी ट्वीट करून आपल्या हातावर शिक्का मारल्यामुळे कसा परिणाम झाला याचे छायाचित्र शेअर केले आहे. मधू याक्षी यांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारल्यामुळे जखम झाली आहे. मधू याक्षी यांनी याबद्दल केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांना ट्वीटरवर टॅग करून तक्रार केली आहे. प्रिय हरदीप सिंह पुरी जी, परदेशातून भारतात आल्यावर विमानतळावर होम क्वारंटाइन होण्यासाठी हातावर शिक्का मारला जात आहे. पण, त्याच्या केमिकलकडे लक्ष द्या, माझ्या हातावर दिल्ली विमानतळावर शिक्का मारण्यात आला होता, पण हातावर त्याचे रिअ‍ॅक्शन झाले आहे.

मधू याक्षी यांनी तक्रार केल्यानंतर केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सुद्धा ट्वीटरवरच उत्तर देताना म्हटले आहे की, आपण ही बाब माझ्या लक्षात आणून दिली, त्याबद्दल आपला आभारी आहे. याबद्दल विमानतळ अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सीएमडीसोबत चर्चा करणार आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रवाशांना होम क्वारंटाइन होण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची ओळख व्हावी या हेतूने त्यांच्या हातावर होम क्वारंटाउनचा शिक्के मारले जात आहे. देशात विमान सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे प्रत्येक विमानतळावर येणा-या जाणा-या प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारला जात आहे. निळ्या रंगाचा क्वारंटाइनचा शिक्का मारला जात आहे.

फुफ्फु से खराब होण्याची शक्यता
युद्ध प्रदूषण के विरुद्ध या नावाने दिल्ली सरकारने हवा प्रदूषणाच्या अनुषंगाने कॅम्पेन सुरू केले आहे. शहरातील प्रदूषणाच्या १३ हॉटस्पॉटवर लक्ष केंद्रित करून ही मोहीम राबविली जाणार आहे. कोरोना संसर्गाच्या काळात खराब हवा प्राणघातक ठरू शकते, त्यामुळे फुफ्फुसे खराब होऊ शकतात, असा इशारा आरोग्य विभागाने दिला आहे.

खराब हवा प्राणघातक
कोरोना संसर्गाच्या काळात खराब हवा प्राणघातक ठरू शकते, असा इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना दिला. हवा प्रदूषणाच्या विरोधातील एका मेगा कॅम्पेनची सुरुवातही यावेळी केजरीवाल यांनी केली.

शेंबेकरसर : ज्ञानाचा रसाळ ग्रंथ!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या