मुलानं घेतली थेट पोलिसांकडे धाव : लॉकडाऊनच्या काळात एकेदिवशी पोपट उडून गेले जेव्हा…..
जयपूर, 31 मे : राजस्थानातील राजसमंद जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. राजसमंद जिल्ह्यातील असलेल्या गावात एका मुलाने दोन पोपट पाळले होते. लॉकडाऊनमध्ये ते दोन्ही पोपट उडून गेले होते. लॉकडाऊनमध्ये नियम शिथिल झाल्यानंतर घरच्यांनी पोपटांचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा एका महिलेनं दोन्ही पोपट पकडून पिंजऱ्यात ठेवल्याचं समोर आलं. मुलाने महिलेकडे पोपट परत करण्याची विनंती केली तर तिने नकार दिला. त्यानंतर मुलानं थेट पोलिसांकडे धाव घेतली.
राजसमंद जिल्ह्यातील कुंवारिया गावात राहणाऱ्या करण सेनने पोपटाची जोडी पाळली होती. यात एकाचे नाव कृष्ण तर दुसऱ्याचं नाव कृष्ण ठेवलं होतं. लॉकडाऊनच्या काळात एकेदिवशी पोपट उडून गेले. त्यावेळी त्यांचा शोध घेता आला नाही. मात्र जेव्हा नियम थोडे शिथिल केले तेव्हा घरच्या लोकांनी बाहेर शोध घेतला. दोन्ही पोपट एका महिलेनं पकडल्याचं समजलं. करणने कुटुंबाला याची माहिती दिली.
Read More ‘मन की बात’; ट्रॅक्टरद्वारे गावात सॅनिटायझरची फवारणी करणाऱ्या नाशिकच्या शेतकऱ्याचे कौतुक
घरच्या लोकांनी महिलेकडं पोपट परत द्या अशी विनंती केली. मात्र महिलेनं यासाठी नकार दिला. फक्त 11 वर्षांच्या असलेल्या करणने रडत रडत पोलिस ठाणे गाठले. त्यानं पोलिसांसमोर सांगितलं की, एका महिलेनं त्याचे दोन पोपट पकडले आहेत. ते परत देत नाहीत तुम्ही ते मिळवून द्या. पोलिसांनी महिलेला दोन्ही पोपटांसह पोलीस स्टेशनला बोलवलं. त्यानंतर पोपट कोणाचे आहेत हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही पोपटांनीच त्यांचा मालक कोण याची साक्ष पोलिसांसमोर दिल्याची माहिती मिळते.
पोलिस अधिकारी पेशावर खान यांनी सांगितले की, करणने जेव्हा राधा कृष्ण अशी हाक मारली तेव्हा दोन्ही पोपट उडून त्याच्या खांद्यावर येऊन बसले. यावरूनच पोलिसांनी दोन्ही पोपट करणचे असून ते त्याला परत करावेत असं महिलेला सांगितलं. त्यानंतर महिलेनं ते पोपट करणला परत दिले.