24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयराफेल पुढील वर्षीच हवाई दलात

राफेल पुढील वर्षीच हवाई दलात

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : हवाई दलामध्ये २०२२ पर्यंत ३६ राफेल विमाने समाविष्ट होतील, असे हवाई दलाचे प्रमुख एअरचीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांनी रविवार दि़ २० जून रोजी सांगितले. कोरोनामुळे एक ते दोन लढाऊ विमाने यायला विलंब झाला असून, बरीच विमाने वेळेच्या आधी भारतामध्ये दाखल झाल्याचे ते म्हणाले. ही विमाने नेमकी कधी सक्रिय होणार याची माहिती आपणा सर्वांनाच आहे, वेळेचा विचार केला तर आम्ही वेळ पाळली असे म्हणावे लागेन, असेही भदौरिया यांनी स्पष्ट केले.

दरम्यान फ्रान्सकडून ३६ राफेल विमाने खरेदी करण्यासाठी भारत सरकारने २०१६ मध्ये ५९ हजार कोटी रुपयांचा करार केला होता. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनीही पुढील वर्षीच्या एप्रिलअखेरपर्यंत सगळी विमाने हवाई दलामध्ये सहभागी होतील असे म्हटले आहे. लडाखमधील स्थितीवर बोलताना भदौरिया म्हणाले की, सध्या दोन्ही बाजूंनी चर्चा सुरू आहे. संघर्षस्थळापासून दोन्ही देशांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आमचा पहिला प्रयत्न हा बोलणी सुरू ठेवणे हाच आहे आणि दुस-या बाजूने माघारीसाठी प्रयत्न केले जात आहेत. जमिनीवर काय हालचाली घडत आहेत यावर देखील लक्ष आहे.

भारताला मिळणार आणखी दोन लस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या