20.4 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home राष्ट्रीय राहुल गांधींना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप

राहुल गांधींना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली – हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांना यमुना एक्सप्रेस-वेवर रोखण्यात आले होते. त्यानंतर राहुल गांधी यांना पोलीसांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. त्यानंतर राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्काराचे पडसाद संपूर्ण देशभरात पसरत आहे. आज हाथरस येथे 144 कलमाअंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आल्याने तेथे कोणालाही जाण्यास बंदी घालण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. याच वेळी पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांना रोखलं. तेव्हा राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी केली जात होती. याच दरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की करण्यात आली आणि यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केल्याची माहिती मिळत आहे.

राहुल गांधी यांनी पोलिसांनी लाठीचार्ज करुन आपल्याला खाली पाडलं असल्याचं म्हटलं आहे. तसेच “पोलिसांकडून मला धक्काबुक्की करण्यात आली. लाठीचार्ज करुन मला खाली पाडलं. फक्त मोदीच या देशात चालू शकतात का? सर्वसामान्य व्यक्तीला ही परवानगी नाही का?” असं देखील म्हटलं आहे.

देशभरातून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी राहुल गांधी यांची कॉलर पकडण्यात आल्याचे सांगितले जात आहे व पोलिसांसोबत झालेल्या धक्काबुक्कीत राहुल गांधी जमिनीवर पडले. यावेळी त्यांच्यासोबत काही काँग्रेस कार्यकर्ते व नेतेही होते. मात्र अशाही परिस्थितीत राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेणारच असल्याचे सांगितले आहे. ‘कितीही झालं तरी मी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याशिवाय जाणार नाही’, असे राहुल गांधींनी सांगितले आहे.

देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या