23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयराजकारणात प्रवेश केल्यापासून काँग्रेसची हीच अवस्था

राजकारणात प्रवेश केल्यापासून काँग्रेसची हीच अवस्था

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राहुल गांधींकडे राजकीय कुशाग्र बुद्धी नाही. राजकारणात प्रवेश केल्यापासून काँग्रेसची हीच अवस्था आहे. काँग्रेस कार्यकारिणीलाही काही अर्थ नाही. सोनिया गांधींच्या काळात फक्त सीडब्ल्यूसी होती. परंतु, १० वर्षांत २५ सदस्य आणि ५० विशेष निमंत्रितांपर्यंत वाढले आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांचा सर्वांना सोबत घेऊन सहमतीने राजकारण करण्यावर विश्वास ठेवत. परंतु, राहुल गांधींच्या बाबतीत तसे नाही, असे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर गुलाम नबी आझाद म्हणाले.

सोनिया गांधींनी १९९८ ते २००४ पर्यंत सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे काम केले. मोठ्या नेत्यांचे सल्ले त्या घेत असे. त्यांनी मला आठ राज्यांची जबाबदारी दिली होती. सात राज्यांत विजय मिळाला. त्यांनी कुठेही हस्तक्षेप केला नाही. २००४ नंतर राहुल गांधींचा प्रवेश झाल्यापासून ही व्यवस्था संपुष्टात आली आहे. सोनिया गांधी यांचे राहुलवरील अवलंबित्व वाढले आहे. मात्र, राहुल गांधींकडे राजकीय कौशल्य नाही. सर्वांनी राहुल गांधींशी समन्वय साधावा, अशी सोनिया गांधींची इच्छा आहे.

नरेंद्र मोदी हे निमित्त आहे. जी २३ च्या वतीने पत्र लिहिल्यापासून या लोकांना माझ्याशी समस्या होत्या. त्यांना कोणीही लिहू नये किंवा प्रश्न विचारावा असे वाटत नाही. काँग्रेसच्या अनेक बैठका झाल्या; पण, एकही सूचना मान्य झाली नाही. मला काँग्रेस सोडण्यास भाग पाडले, असे गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसने स्वत:वर केलेल्या हल्ल्यांना उत्तर देताना सांगितले.

गुलाम नबी आझाद यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेस सोडताना सोनिया गांधींना पाच पानी पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी काँग्रेसमध्ये चांगली व्यवस्था असल्याचे म्हटले होते. सोनिया गांधींच्या काळात ते कायम होते. परंतु, राहुल गांधींच्या आगमनाने सर्व काही कोलमडले. याशिवाय २०१४ मध्ये काँग्रेसच्या पराभवासाठी राहुल गांधींच्या वृत्तीला जबाबदार धरले. राहुल गांधी यांनी मंत्रिमंडळाने काढलेला अध्यादेश फाडला होता. त्यामुळे खुद्द पंतप्रधान आणि सरकारची प्रतिष्ठा पणाला लागली, असेही आझाद म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या