28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयराहुल गांधींची चिमुरडीला चप्पल घालायला मदत

राहुल गांधींची चिमुरडीला चप्पल घालायला मदत

एकमत ऑनलाईन

कोच्ची : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाचे इतर अनेक सदस्य भारत जोडो यात्रेवर आहेत. यात्रेदरम्यान काँग्रेस नेते लोकांशी संवाद साधत देशातील अनेक भागांमध्ये रॅली काढत आहेत. भारत जोडो यात्रा, सध्या केरळमध्ये दाखल झाली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो यात्रा रविवारी केरळमधील हरिपद येथून पुन्हा सुरू झाली, ज्यात पक्षाचे शेकडो कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते. सकाळी ६.३० नंतर सुरू झालेल्या यात्रेचा ११ वा दिवस सुरू आहे, दरम्यान, राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते एका मुलीला सँडल घालण्यास मदत करताना दिसत आहेत.

हा व्हिडिओ अलप्पुझा जिल्ह्यातील अंबालापुझा शहरातील असल्याचे सांगण्यात येत आहे. राहुल गांधी इतर पक्षाच्या नेत्यांसोबत रस्त्यावर चालताना दिसत आहेत. एक माणूस एका लहान मुलीचा हात धरून त्यांच्या थोडे पुढे चालत आहे. राहुल गांधी तिला आवाज देऊन थांबवतात आणि मुलीची चप्पल निघाली असल्याची माहिती देतात. यानंतर ते स्वतः मुलीला व्यवस्थित चप्पल घालू लागतात. राहूल गांधी यांंनी स्वतः खाली वाकून त्या मुलीला चप्पल घालण्यात मदत केली. दरम्यान राहुल गांधींच्या या वागणूकीचे सध्या सोशल मीडिया यूजर्सनी खूप कौतुक केले आहे. राहुल गांधींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत हजारो लोकांनी तो पाहिला आहे. राहुल गांधींच्या कृतीने अनेक लोकांची मने जिंकली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या