22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeराष्ट्रीयराहुल गांधी : भारताला मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवत आहे

राहुल गांधी : भारताला मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवत आहे

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांचा आज ८८ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसासाठी सर्वच क्षेत्रातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यातच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वाढदिवसानिमित्त ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. देशाला त्यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवत असल्याचे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

‘भारताला मनमोहन सिंग यांच्यासारख्या पंतप्रधानाची कमतरता जाणवत आहे. त्यांचा प्रामाणिकपणा, सभ्यता आणि समर्पण आम्हा सर्वांसाठी प्रेरणा आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा,’ असे राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

यासोबतच मनमोहन सिंग यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. मनमोहन सिंग यांचा जन्म भारताच्या फाळणीआधी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात २६ सप्टेंबर १९३२ रोजी झाला. २००४ मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेण्याआधी मनमोहन सिंग १९९८ ते २००४ पर्यंत राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपदी होते. २००४ ते २०१४ या कार्यकाळात मनमोहन सिंग देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होते.

गुप्तेश्वर पांडे यांचा नितीश कुमारच्या जेडीयुमध्ये प्रवेश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या