24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयराहुल गांधी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता नाही

राहुल गांधी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राहुल गांधी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता नाही, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर असून विविध राज्यांमधून त्यांचा प्रवास सुरु आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक दिल्लीमध्ये पार पडणार आहे. पण राहुल गांधी आपली भारत जोडो यात्रा अर्ध्यावर सोडून निवडणुकीसाठी दिल्लीला जाणार नाहीत. सध्या ही यात्रा केरळमध्ये असून २९ सप्टेंबर रोजी ती कर्नाटकात प्रवेश करेल. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्यााची ३० सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यामुळं राहुल गांधी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता नाही, अशी माहिती काँग्रेसच्या सूत्रांची दिली आहे. दरम्यान, राहुल गांधींची सध्या पक्ष बांधणीसाठी देशभरात यात्रा सुरु आहे.

दुसरीकडे शशी शरुर काँग्रेस अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. यासाठी त्यांनी कालच सोनिया गांधींची देखील भेट घेतली. या भेटीनंतर सोनिया गांधींनी त्यांना निवडणुकीसाठी परवानगीही दिली आहे. तर दुसरीकडे सुरुवातीपासून अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नावाची चर्चा होती. पण आपल्याला राज्यातून बाहेर पडायचे नसल्याचे सांगत त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे गेहलोत आणि राहुल गांधी हे दोन्ही जर ही निवडणूक लढवणार नसतील तर अध्यक्षपदाची माळ शशी थरुर यांच्याच गळ्यात पडू शकते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या