22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयराहुल गांधी तमिळ मुलीशी लग्न करायला तयार

राहुल गांधी तमिळ मुलीशी लग्न करायला तयार

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या कन्याकुमारी ते कश्मिर अशी भारत जोडो यात्रा करत आहेत. या यात्रेचा आज चौथा दिवस आहे. शनिवारी दुपारी त्यांनी कन्याकुमारी येथील मार्तंडम येथे मनरेगा महिला कामगारांची भेट घेतली. राहुल गांधी स्थानीक महिलांशी बोलताना एक महिलेने सांगितले की तिला राहुल गांधींच्या तामिळनाडू वरील प्रेमाबद्दल माहिती आहे आणि राहुल गांधी तमिळ मुलीशी लग्न करण्यास तयार आहे.

बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात काँग्रेसने ७ सप्टेंबरला कन्याकुमारीपासून भारत जोडो यात्रेला सुरूवात केली आहे. आणि शनिवारी ही यात्रा तमिळनाडूमध्ये पोहचली होती. शनिवारी राहुल गांधी यांनी आशियातील पहिली महिला बस चालक ६३ वर्षीय वसंताकुमारी यांची भेट घेतली, आणि मार्तंडममधील स्वच्छता कर्मचा-यांशीही संवाद साधला. राहुल गांधी तामिळनाडू दौ-याच्या शेवटी केरळ सीमेजवळ चहाच्या दुकानाच्या मालकांशी चर्चा करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या