26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयराहुल गांधींनी सांगितले मोदींच्या ६ वर्षातील अपयशाचे रहस्य

राहुल गांधींनी सांगितले मोदींच्या ६ वर्षातील अपयशाचे रहस्य

एकमत ऑनलाईन

३.३८ मिनिटांचा व्हिडिओ : मागील सहा वर्षांमध्ये भारताची मोठी पीछेहाट झाली

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात कॉँग्रेसनेते राहुल गांधी खूप आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. सोशल मिडियावर त्यांचे मोठ्या संख्येने फॉलोअर्स ची संख्या वाढत आहेत. नुकताच त्यांनी एक व्हीडीओ शेअर करून खळबळ माजवली आहे. अतीशय मुद्देसुद मांडणी करून त्यांची मोदींवर प्रहार केले आहेत. पहा काय म्हटलेय त्यांनी भारताचे सर्व शेजारी देश आता मित्र न राहता एकतर बाजूला गेले आहेत किंवा थेट भारताचे शत्रू झालेले आहेत. परिणामी भारतामध्ये सर्वच क्षेत्रात निर्माण झालेल्या संकटांकडे लक्ष वेधणारा खास ३.३८ मिनिटांचा व्हिडिओ कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शेअर केला आहे.

तात्कालिक चुकांचा परिणाम आता देशाला वेगळ्या स्वरुपात भोगावा लागत आहे

त्यांनी म्हटले आहे की, परराष्ट्र व्यवहार, अर्थव्यवस्था, सामाजिक धोरण आणि विश्वास या सगळ्यांमध्ये मागील सहा वर्षांमध्ये भारताची मोठी पीछेहाट झालेली आहे. अशावेळी डाव साधून चीनने कुरापत काढली आहे. तात्कालिक चुकांचा परिणाम आता देशाला वेगळ्या स्वरुपात भोगावा लागत आहे.

Read More  संपादकीय : शिक्षणाचा ‘घो’!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या