राहुल गांधी यांना काहीतरी करून दाखवायचे आहे पण त्यांची गुणवत्ता आणि क्षमता अपुरी पडते, अशी टिप्पणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली आहे. राहुल गांधी हे कसल्या तरी अदृश्य दडपणाखाली असतात. राहुल गांधी म्हणजे असा विद्यार्थी आहेत की, ज्याला शिक्षकांसमोर चांगली कामगिरी करुन दाखवायची असते. पण कुठेतरी त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता किंवा संबंधित विषयात प्रावीण्य मिळवण्याची क्षमता कमी पडते, असे मत बराक ओबामा यांनी मांडले.
बराक ओबामा यांनी आपल्या नव्या पुस्तकात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि केरळमधील वायनाड येथील खासदार राहुल गांधी यांच्याबाबत उल्लेख करतान म्हटले आहे की, राहुल गांधी हे एक नर्व्हस आणि अपरिपक्व व्यक्ती आहेत. एखादा विद्यार्थी जसा आपल्या अभ्यास करून शिक्षकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याच्यामध्ये त्या विषयात प्राविण्य मिळवण्याची पात्रता नसते किंवा त्या विषयाबाबत आवडीचा अभाव असतो, तसं त्यांच्याबाबत घडत आहे.
More than anyone else, I wrote my book for young people—as an invitation to once again remake the world, and to bring about, through hard work, determination, and a big dose of imagination, an America that finally aligns with all that is best in us. https://t.co/1yZrYWuckX
— Barack Obama (@BarackObama) November 12, 2020
बराक ओबामा यांच्या व्हाईट हाऊसमधील अनुभवांवर आधारित ‘अ प्रॉमिस लँड’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यानंतर ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये या पुस्तकाचे परीक्षण छापून आले होते. या परीक्षणात ओबामा यांच्या पुस्तकातील अनेक रंजक गोष्टींचा उल्लेख आहे. ओबामा यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात भेट घेतलेल्या जागतिक नेत्यांविषयीचे अनुभव कथन केले आहेत.
दरम्यान, बराक ओबामा यांनी आपल्या या पुस्तकात भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. अपार निष्ठा बाळगणारी व्यक्ती असा उल्लेख ओबामा यांनी केला आहे. या पुस्तकामध्ये अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.बराक ओबामा हे २०१७ मध्ये भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांची आणि राहुल गांधी यांची भेट झाली होती. बराक ओबामा यांच्या भेटीनंतर राहुल गांधी यांनी एक ट्विट केले होते. त्यात ते म्हणाले होते की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत उपयुक्त चर्चा झाली. त्यांना पुन्हा एकदा भेटणे हा चांगला अनुभव होता.
पत्रकबाजीवर राणा पाटील यांच्या प्याद्यांनी बोलावे हाच विनोद