22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयराहूल गांधींचा मोदींवर पुन्हा निशाणा! : पंतप्रधानांचा भारतीय लष्करावर विश्वास नाही

राहूल गांधींचा मोदींवर पुन्हा निशाणा! : पंतप्रधानांचा भारतीय लष्करावर विश्वास नाही

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पतंपर्दना नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विटरवरून टीका केली आहे. राहुल गांधी यांनी देशाच्या लष्कराविषयी विश्वास व्यक्त करत मोदींच्या भ्याडपणामुळे चीननं भारताची जमीन घेतल्याचा आरोप केला आहे. पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांनी भारत- चीन सीमावादावरून ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘प्रत्येकाला भारतीय लष्कराच्या क्षमता आणि शौर्यावर विश्वास आहे. फक्त पंतप्रधानांना वगळून. ज्यांच्या भ्याडपणानं चीनला आमची जमीन घेण्याची परवानगी दिली. ज्यांच्या खोटेपणामुळे हे निश्चित होईल की ते हे कायम ठेवतील.’ असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

या आधी शुक्रवारी राहुल गांधी यांनी लडाख मुद्द्यावरून मोदींना लक्ष्य केलं होतं. ‘केंद्र सराकर लडाखमधील मुद्दयावरून चीनचा सामना करण्यास घाबरत आहेत. तिथे घडत असलेल्या घटना या गोष्टीची साक्ष देत आहेत की, चीन स्वतःला तयार करत आहे आणि स्वतःची स्थिती मजबूत बनवत आहे. पंतप्रधानांकडे असलेल्या वैयक्तिक धाडसाच्या अभावामुळे आणि माध्यमांच्या मौनामुळे भारताला याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

गलवान खोऱ्यात दोन्ही देशाचे सैन्य आमनेसामने आल्यामुळे लष्करी संघर्ष झाला होता. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले होते. या संघर्षापासून सीमेवर तणाव असून, दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. यामुळे काँग्रेसकडून मोदी सरकारच्या चीनविषयक भूमिकेवर टीका केली जात आहे.

पक्ष्याच्या घरट्‍यासाठी आलिशान गाडीचा त्याग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या