22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयराहुल गांधी भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करणार

राहुल गांधी भारत जोडो यात्रेचे नेतृत्व करणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाला नकार दिल्यानंतर आता भारत जोडो मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले आहे. या मोहिमेच्या तयारीसाठी त्यांनी सोमवारी दिल्लीच्या कॉन्सिट्यूशन क्लबमध्ये सिव्हिल सोसायटीचे सदस्य व काही प्रमुख व्यक्तींशी चर्चा केली. राहुल येत्या ७ तारखेपासून संपूर्ण देशात भारत जोडो यात्रा सुरू करणार आहेत.

काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत चालणारी ही यात्रा तब्बल १५० दिवस चालेल. त्यात ३५०० किमीचा प्रवास केला जाईल. यात्रेत राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व वेगवेगळ््या भागांतील नेत्यांचा समावेश असेल. काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांच्या माहितीनुसार या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस देशातील १२ राज्य व २ केंद्रशासित प्रदेश कव्हर केले जाणार आहेत.

उदयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढण्याची घोषणा केली होती. शिबिराच्या अखेरच्या दिवशी भाषणात राहुल म्हणाले होते की, काँग्रेस पुन्हा जनतेत जाणार आहे. त्यांच्यासोबतचे आपले नाते मजबूत करणार असून, हे काम शॉर्टकटने होणार नाही. यासाठी आम्ही मोठे कष्ट करू.

एप्रिलम महिन्यात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या एका बैठकीत निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेतृत्वाला विविध सूचना केल्या होत्या. त्यात त्यांनी देशातील वेगवेगळ््या भागांतील जवळपास २०० प्रभावी व्यक्ती, कार्यकर्ते व सिव्हिल सोसायटीच्या सदस्यांशी संवाद साधण्याचा सल्ला दिला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या