22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयराहुल गांधी कंटेनरच्या कॅबिनमध्ये झोपून करणार भारतभर प्रवास

राहुल गांधी कंटेनरच्या कॅबिनमध्ये झोपून करणार भारतभर प्रवास

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी कंटेनरच्या केबिनमध्ये झोपणार आहेत. १४८ दिवसांचा हा प्रवास कन्याकुमारीपासून सुरू होऊन काश्मीरमध्ये संपेल. कंटेनर केबिन ५ सप्टेंबर रोजी कन्याकुमारीला पोहोचेल. ३५०० किमीचा हा प्रवास ७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

या संदर्भात काँग्रेस पक्षाने माहिती दिली. विशेष म्हणजे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात केंद्र सरकारविरोधात जनमत तयार करण्यासाठी काँग्रेस पक्ष भारतजोडो ही यात्रा काढत आहे. या भेटीदरम्यान काँग्रेसपक्ष महागाई, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेतील घसरणीचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे.

७ सप्टेंबरपासून सुरू होणारी ‘भारत जोडो’ यात्रा ऐतिहासिक असल्याचे सांगत काँग्रेसने सोमवारी दावा केला की, भारतीय जनता पक्ष (भाजप) त्यांच्या या हालचालीने थक्क झाला आहे. ‘भारत जोडो’ यात्रेशी संबंधित पक्षाचे सरचिटणीस, प्रदेश प्रभारी, प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय समन्वयकांची बैठक झाली, ज्यामध्ये या यात्रेच्या तयारीवर चर्चा करण्यात आली.

बैठकीनंतर काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांनी पत्रकारांना सांगितले की, त्यांनी भारत जोडो यात्रेच्या तयारीबाबत चर्चा केली. हा प्रवास मोठा आणि ऐतिहासिक असेल. तसेच भाजप लक्ष विचलित करण्यासाठी विविध युक्त्या अवलंबणार अशी शक्यताही त्यांनी वर्तविली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या