22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयराहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’

राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्टने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’बद्दल ट्विट केले आहे. राहुल गांधी आजपासून कन्याकुमारी येथून पक्षाच्या भारत जोडो यात्रेला सुरुवात करणार आहेत. यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी तामिळनाडूतील श्रीपेरुंबदूर येथे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मारकाला भेट दिली.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा १२ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधून जाणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या या पदयात्रेत ३,५७० किमी अंतर कापले जाणार आहे. ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरू होऊन काश्मीरमध्ये संपेल. या यात्रेबद्दल पूजा भट्टने ट्विट केले आले. हे ट्विट सोशल मीडियावर खूप वाचले जात आहे. ‘श्रीपेरुंबदूर येथे राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ प्रार्थना सभेद्वारे #भारत जोडो यात्रेची शानदार सुरुवात. वेदना म्हणजे वेदना आणि नुकसान म्हणजे नुकसान, याला कोण कसे समजते. वेदना पुन्हा अनुभवणे आणि आत्मसात करणे हे एक दुर्मीळ वैशिष्ट्य आहे. राहुल गांधींना हे करताना पाहिले’ असे पूजा भट्टने ट्विटमध्ये लिहिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या