21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयराहुल गांधींचे ट्रॅक्टर्स पोलिसांनी थांबविले

राहुल गांधींचे ट्रॅक्टर्स पोलिसांनी थांबविले

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ राहुल गांधी यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहचले. तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर तळ ठोकून बसलेल्या शेतकºयांच्या समर्थनार्थ राहुल गांधी यांनी सोमवार दि़ २६ जुलै रोजी ट्रॅक्टरवर स्वार होत मोदी सरकारचा विरोध केला. पण राहुल गांधी संसदेत पोहचल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ट्रॅक्टरसह काँग्रेस नेत्यांनाही ताब्यात घेतले. या सर्व घटनेमुळे सोशल मीडियावर काँग्रेस समर्थक नेटक-यांनी दिल्ली पोलिस आणि मोदी सरकारच्या धोरणावर कडाडून टीका केली.

सध्या संसदेचे मान्सून सत्र सुरु असल्यामुळे परिसरात कलम १४४ लागू आहे. असे असतानाही राहुल गांधी काँग्रेस नेत्यासह ट्रॅक्टरवर स्वार होत संसदेत पोहचले. राहुल गांधी संसदेत पोहचले मात्र, नियमांचे उल्लघंन केल्या प्रकरणी पोलिसांनी रणदीप सुरजेवाला आणि श्रीनिवास बी.वी़ या नेत्यांसह ट्रक्ट्रर आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
शेतक-यांचा आवाज दाबला जातोय

संसदेत दाखल होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी मोदींच्या धोरणार टीका केली. ते म्हणाले, आम्ही शेतक-यांचा संदेश घेऊन संसदेत आलो आहोत. शेतक-यांचा आवाज दाबला जात आहे. सरकारला शेती कायदे मागे घ्यावेच लागतील. हे कायदे २-३ बड्या उद्योगपतींसाठी आहेत. शेतक-यांच्या फायद्यासाठी नाहीत, नफ्यासाठी नाहीत. हे काळे कायदे आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या