नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया आणि राहुल यांची चौकशी केल्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने दिल्लीतील हेराल्ड हाऊसवर छापा टाकला. कागदपत्रांच्या शोधात ईडीने नॅशनल हेराल्डच्या ठिकाणांवर छापे टाकले.
यादरम्यान १० जनपथवर झालेल्या बैठकीची कागदपत्रेही तपासली जात आहेत. या प्रकरणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या लोकांवर छापेही टाकले जाण्याची शक्यता आहे.