22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयरेल्वेची जमीन ३५ वर्षांसाठी लीजवर घेता येणार

रेल्वेची जमीन ३५ वर्षांसाठी लीजवर घेता येणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची माहिती देताना कॅबिनेट मंत्री अनुराग ठाकूर यांनी बैठकीत रेल्वे जमीन भाडेपट्ट्यात बदल करण्यास मंत्रिमंडळाने मंजूरी दिली असून, लीज कालावधी ५ वर्षांवरून ३५ वर्षांपर्यंत वाढवण्यात आला आहे. याशिवाय रेल्वेच्या जमिनीच्या रेल्वे लँड लीज (एलएलएफ) शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रेल्वेच्या जमिनीचा एलएलएफ कापण्याचा निर्णय घेण्यात आला. जमीन परवाना शुल्क ६ टक्क्यांवरून १.५ टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. आता जमिनीच्या बाजारमूल्यावर दीड टक्का जमीन भाडेपट्टा शुल्क आकारण्यात येणार आहे. यामध्ये एक रुपये प्रतिचौरस फूट दराने शुल्क भरावे लागणार आहे. यासोबतच पीपीपी पद्धतीने शाळेच्या इमारती आणि रुग्णालये बांधण्यासाठी या जमिनीचा वापर करता येईल. सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी कमी खर्चात जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. लीजच्या दीर्घ कालावधीसह गुंतवणूक वाढेल.

५ वर्षात ३०० वर पीएम गतिशक्ती टर्मिनल बांधणार
अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली की, पीएम गतिशक्ती फ्रेमवर्क लागू करण्यासाठी रेल्वेच्या जमीन भाडेपट्ट्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत. पुढील ५ वर्षांत ३०० हून अधिक पीएम गतिशक्ती टर्मिनल्स बांधले जातील. यामुळे १.२५ लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

५ वर्षात १४,५९७ मॉडेल स्कूल विकसित करणार
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, पीएम-श्री योजनेअंतर्गत पाच वर्षांच्या कालावधीत २७,३६० कोटी रुपये खर्चून देशात १४,५९७ शाळा विकसित केल्या जातील. पीएम-श्री शाळांत शिक्षण देण्याचा मार्ग आधुनिक, परिवर्तनकारी आणि सर्वांगीण असेल. ज्यामध्ये अध्यापनाद्वारे शोध आणि शिकवण्याच्या पद्धतींवर भर दिला जाणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञान, स्मार्ट क्लासरूम, क्रीडा आणि इतर सुविधांसह आधुनिक पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले जाईल. एका ब्लॉकमध्ये २ मॉडेल स्कूल विकसित करण्यात येणार आहेत.

ग्रामीण भागातही शाळांचा विकास
ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही ठिकाणी ही संस्था उभारण्यात येणार आहेत. या शाळांसाठी पोर्टल तयार करण्यात येणार आहे. ज्यामध्ये राज्ये आणि शाळादेखील मॉडेल स्कूलच्या विकासासाठी अर्ज करू शकतील.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या