23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयवृद्धांच्या तिकिटांवरील सवलत रद्द करून रेल्वेची १५०० कोटींची कमाई

वृद्धांच्या तिकिटांवरील सवलत रद्द करून रेल्वेची १५०० कोटींची कमाई

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने कोरोना महामारीपासून वृद्धांना तिकिटांवर दिली जाणारी सवलत काढून टाकून मोठा फायदा घेतला आहे. मार्च २०२० पासून दोन वर्षांत रेल्वेला सुमारे १५०० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळाल्याचे एका आरटीआयद्वारे उघड झाले आहे.

मध्य प्रदेशातील चंद्रशेखर गौर यांनी हा आरटीआय दाखल केला आहे. उत्तरात, रेल्वेने सांगितले की, २० मार्च २०२० ते ३१ मार्च २०२२ दरम्यान, रेल्वेने प्रवास करणा-या ७.३१ कोटी वृद्ध प्रवाशांना भारतीय रेल्वेने तिकिटांवर कोणतीही सूट दिली नाही. यामध्ये साठ वर्षांवरील ४ कोटी ४६ लाख पुरुष आणि ५८ वर्षांवरील २ कोटी ८४ लाख महिलांचा समावेश आहे. याशिवाय ८३१० वृद्ध ट्रान्सजेंडरनाही ही सुविधा दिली नाही.
आरटीआयला उत्तर देताना, रेल्वेने सांगितले की, या काळात वृद्ध प्रवाशांच्या

तिकिटांमधून ३,४६४ कोटी रुपयांची कमाई झाली आहे, ज्यामध्ये सवलत न
मिळाल्यामुळे १५०० कोटी रुपयांच्या अतिरिक्त उत्पन्नाचा समावेश आहे. वृद्ध पुरुष प्रवाशांच्या तिकिटाने २,८२ कोटी रुपये कमावले, तर वृद्ध महिला प्रवाशांच्या तिकिटाने १३८१ कोटी रुपये कमावले. वृद्ध ट्रान्सजेंडर्सच्या तिकिटातून ४५ लाख ५८ हजार रुपये मिळाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या