24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeमहाराष्ट्रकेरळमध्ये पावसाने हाहा:कार

केरळमध्ये पावसाने हाहा:कार

एकमत ऑनलाईन

तिरुवनंतपूरम : केरळमध्ये परतीच्या पावसाने हाहा:कार उडाला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे राज्यात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक नागरिक बेपत्ता आहेत. कोट्टायमला पावसाचा अधिक तडाखा बसला आहे. कोट्टायममध्ये आतापर्यंत १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर इडुक्कीमध्ये ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. याशिवाय पावसामुळे पठानमथिट्टा आणि इडुक्कीमध्ये परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे.

पावसाचा तडाख बसलेल्या केरळच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. हवाई दलही मदतीसाठी मैदानात उतरले आहे. याशिवाय नागरिकांना मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या ११ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. कोट्टायम जिल्ह्याच्या आसपासच्या भागात पावसामुळे पूरसदृश परिस्थिती आहे. कोट्टायममध्ये पावसामुळे नद्यांना पूर आला असून नद्यांच्या काठावर बांधलेली अनेक घरे कोसळली आहेत. पाण्याच्या प्रवाहामुळे मोठी वाहनं वाहून गेली आहेत. नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली आहेत.

पंतप्रधान मोदींची केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. मुसळधार पाऊस आणि भूस्खलना घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. जखमी आणि फटका बसलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी काम सुरू आहे. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे. शोकाकुल कुटुंबांबद्दल सहवेदना व्यक्त करतो, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी सांत्वन केले आहे.

उत्तराखंडात रेड अ‍ॅलर्ट
उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेण्यात आली आहे. राज्यातील ज्या भागात पावसाचा फटका बसतो तिथे यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. राज्यात १८ ऑक्टोबरला रेड अलर्ट देण्यात आला असून १७ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत यलो अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना येलो अ‍ॅलर्ट
महाराष्ट्रातसुद्धा ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्याचा समावेश आहे. सकाळपासून राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, पुढच्या २४ तासात राज्यातील काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या