26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयआसाममध्ये पावसाचा हाहाकार नद्यांना पूर; ३ जणांचा मृत्यू

आसाममध्ये पावसाचा हाहाकार नद्यांना पूर; ३ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानाचा पारा ४५ अंशाच्या वर पोहोचला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक हैराण आहेत. मात्र, आसाममध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. नद्यांना पूर आला असून अनेक गावांमध्ये भूस्खलन झाले आहे. यामध्ये ३ लोकांचा मृत्यू झाला आहे.
आसाममधील दिमा हासाओ जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. दिमा हासाओ जिल्ह्यातील हाफलांग भागात शनिवारी भूस्खलनाची घटना घडली. यामध्ये एका महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला. दिमा हासाओ जिल्ह्यातील १२ गावांमध्ये भूस्खलनाची नोंद झाली आहे. सुमारे ८० घरांचे नुकसान झाले आहे. याबाबत आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने माहिती दिली आहे.

आतापर्यंत कचार, धेमाजी, होजाई, कार्बी आंगलाँग पश्मि, नागाव आणि कामरूप (मेट्रो) या सहा जिल्ह्यांतील ९४ गावांतील एकूण २४,६८१ लोक पुरामुळे प्रभावित झाल्याचे आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले. तसेच मुसळधार पावसामुळे हाफलांग भागात रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. याचा व्हीडीओ देखील समोर आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या