27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयसंसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून?

संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार दि. १८ जुलैपासून सुरू होऊन १२ ऑगस्ट रोजी ते समाप्त होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या संसदीय समितीने तशी शिफारस केली आहे. याबाबत अधिकृत घोषणा लवकरच होणे अपेक्षित आहे. अर्थसंकप्लीय अधिवेशनात संसदीय समित्यांकडे छाननीसाठी पाठविली गेलेली ४ विधेयके व प्रलंबित राहिलेली अन्य विधेयके या अधिवेशनात मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान काँग्रेस नेते राहूल गांधी यांची गेले दोन दिवस ईडीकडून झालेली चौकशी व पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचीही २३ जूनची प्रस्तावित चौकशी या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवाशनात काँग्रेस आक्रमक रूपात दिसणार हे उघड आहे.

साहजिकच अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. याशिवाय महागाई, बेरोजगारी, नैसर्गिक आपत्ती, शेतक-यांच्या समस्या आदी मुद्यांवरूनही विरोधक चर्चेची मागणी करतील. कोणत्याही संसदीय अधिवेशनाच्या सुरवातीला शांततेत चर्चा करण्याचे आवाहन करायचे व त्याच सुमारास एखादा स्फोटक निर्णय जाहीर करून प्रत्यक्ष दोन्ही सभागृहांत गदारोळच जास्त होईल याची तजवीज करण्याचे वर्तमान सरकारचे डावपेच असतात, असा आरोप विरोधकांनी सातत्याने केला आहे.

राष्ट्रपतींच्या निवडणूकदिनी मतदान करणे सोपे होणार?
राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलै रोजी असल्याने त्याच दिवसापासून अधिवेशनाला प्रारंभ केल्यास संसद सदस्यांना मतदान करणे सोपे होईल व संसदेतच मतदान झाल्याने कागदी मतपत्रिकांच्या मोजणीसाठीही ते सुलभ ठरेल यादृष्टीने राजनाथसिंह समितीने १८ जुलैपासून अधिवेशन घेण्याची शिफारस केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या