24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयसंसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून?

संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरु होऊ शकते. हे अधिवेशन १३ ऑगस्टपर्यंत सुरु राहण्याची शक्यता आहे. १९ जुलै ते १३ ऑगस्टच्या दरम्यान मॉन्सून सत्र ठेवण्याची शिफारस केली आहे. यासंदर्भात खासदारांना हे अधिवेशन सुरु व्हायच्या आधी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास एका महिन्यापर्यंत चालणा-या या मॉन्सून सत्रादरम्यान २० बैठका होण्याची शक्यता आहेत. सामान्यत: संसदेचे पावसाळी अधिवेशन जुलैच्या तिस-या आठवडयात सुरु होते आणि स्वातंत्र्यदिनाच्या आधी समाप्त होते. सूत्रांनी सांगितले की, संसदीय कार्यविषयक कॅबिनेट समितीने या अधिवेशनाच्या कार्यकाळासंदर्भात शिफारस केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सत्राच्या दरम्यान संसद परिसरात कोरोनाशी निगडीत सर्व प्रकारच्या प्रोटोकॉलचे पालन केले जाईल. या अधिवेशनाच्या दरम्यान संसद परिसरात प्रवेश करणा-यांनी कोरोना लसीचा कमीतकमी एक डोस घेतलेला असणे अनिवार्य असणार आहे.

ड्रोन हल्ल्याचा तपास एनआयएकडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या