26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयआजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सोमवार दि. १९ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पूर्वसंध्येला सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत बिर्ला यांनी अधिवेशनाचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्याचे आवाहन केले. दि. १३ ऑगस्टपर्यंत चालणा-या या अधिवेशनात ३१ विधेयके मांडले जाणार आहेत, असे सांगण्यात आले. विविध मुद्यांवर कॉंग्रेससह विरोधी पक्ष आक्रमक असल्याने हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. यावेळी पंतप्रधानांनी संसदेचे कामकाज सुरळीत पार पाडताना सर्व मुद्यांवर चर्चेस सरकार तयार असल्याचे सांगितले. संसदीय नियमांनुसार कोणताही मुद्दा उपस्थित केला, तर सरकारचा त्यावर कसलाही आक्षेप नाही. कामकाज सुरळीत चालण्यासाठी आणि विधेयके मांडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे पंतप्रधान म्हणाले. या अधिवेशन काळात २ डझनपेक्षा जास्त विधेयके मांडले जाणार असून, यात १७ नवे विधेयके आहेत. त्यात तीन अध्यादेशांचा समावेश आहे. या बैठकीला ३३ पक्षांचे ४० पेक्षा जास्त नेते उपस्थित होते. या अधिवेनात नव्या मंत्र्यांची परीक्षा असणार आहे.

राफेल, व्हॅक्सीनेशनवर सरकारला घेरणार : काँग्रेस
पावसाळी अधिवेशनादरम्यान देशात मंद गतीने सुरू असलेले लसीकरण, दुसरी कोरोना लाट, आरोग्य सुविधा आणि राफेल डीलच्या मुद्यावर सरकारला घेरणार आहे. राफेलचा मुद्दा २०१९ मध्ये मोदींच्या दुस-या विजयानंतर शांत झाला आहे. खरे तर फ्रान्सच्या न्यायालयाने जेव्हा या डीलचे आदेश दिले, त्यानंतर राहुल गांधी आणि दुसरे नेते सलग हे मुद्दे उचलून धरत आहेत. त्यामुळे याच मुद्यावरून अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे.

 

आष्टा येथे झाडे पडल्याने वाहतूक ठप्प

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या