25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयमुसेवाला मर्डरचे पुन्हा राजस्थान कनेक्शन

मुसेवाला मर्डरचे पुन्हा राजस्थान कनेक्शन

एकमत ऑनलाईन

लुधियाना : सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात पुन्हा एकदा राजस्थान कनेक्शन समोर येत आहे. आतापर्यंतच्या तपासात पंजाब पोलिसांना समजले आहे की, मुसेवाला यांच्या हत्येसाठी आर्थिक मदत राजस्थानमधून आली होती. तेथून काही शस्त्रेही देण्यात आली. असा सुगावा मिळाल्यानंतर मानसा पोलिसांची टीम राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये गेली आहे, मात्र मानसा पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, नेपाळ-पश्चिम बंगाल सीमेवरून अटक करण्यात आलेला शूटर दीपक मुंडी याने चौकशीदरम्यान उघड केले आहे की, गुंडांना राजस्थान आणि पश्चिम बंगालमधून आर्थिक मदत मिळाली होती. ज्यांनी मारेक-यांना १०० दिवसांहून अधिक काळ आश्रय दिला, त्यांचा आता पर्दाफाश करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. नेपाळ सीमेवरून दीपक मुंडी, कपिल पंडित आणि राजेंद्र जोकर यांना पकडण्यात आले आहे. राजस्थानच्या शेखावाटी परिसरातून हत्येचे कनेक्शन समोर येत आहे. हत्येचे संपूर्ण नियोजन सीकरमध्ये करण्यात आले होते. हत्येमध्ये सहभागी असलेल्या ६ हल्लेखोरांपैकी ५ पंजाबचे आणि १ सीकरचा होता. याशिवाय घटनेत वापरलेले वाहनही सीकरचे होते. एसआयटीचे पथक राजस्थानशी असलेले कनेक्शन तपासण्यात व्यस्त आहेत. या हत्येच्या प्लॅंिनगमध्ये सीकरमधील अनेक हल्लेखोरांचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

रेकीपासून फरार होण्यापर्यंत राजस्थानचे कनेक्शन
पंजाब पोलिसांच्या तपासात बोलेरो गाडी ही राजस्थानची असल्याचे समोर आले आहे. रतिया पुलाजवळ गँगस्टर नसीबने कार चरणजीत सिंग आणि केशव यांना दिली. सोनीपतचा कुख्यात बदमाश प्रियव्रत फौजी आणि त्याचा साथीदार अंकित जाटी सिरसाही त्याच्यासोबत गाडीमध्ये होता. तो २५ मे रोजी पंजाबला निघाला होता आणि बिस्ला येथे वाहनात तेल टाकताना एका सीसीटीव्हीत कैद झाले होते. फौजी आणि सिरसा यांच्या अटकेसाठी पंजाब पोलीस सातत्याने छापेमारी करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या