27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयराजीव गांधींच्या मारेक-याची सुटका होणार

राजीव गांधींच्या मारेक-याची सुटका होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राजीव गांधी यांच्या मारेक-याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. मारेकरी पेरारिवलन याची सुटका होणार आहे. ३० वर्षांनंतर राजीव गांधींचा मारेकरी कारागृहातून बाहेर येणार आहे.

या संदर्भातली एक फाईल राष्ट्रपतींकडे देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी प्रलंबित होती. आज ही सुनावणी पूर्ण झाली आहे. गेले तीस वर्षे राजीव गांधींचा मारेकरी पेरारिवलन कारागृहात शिक्षा भोगत होता. आता तीस वर्षांनंतर त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. आज या प्रकरणातला शेवटचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे.

राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी आत्मघातकी बॉम्बने हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी मुरुगन, संथन, पेरारिवलन, नलिनी, रॉबर्ट पायस, जयाकुमार आणि रविचंद्रन या सात जणांना दोषी ठरवण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या