18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeराष्ट्रीयराजीव गांधींच्या मारेक-यांची सुटका नको; मोदी सरकारने दाखल केली पुनर्विचार याचिका

राजीव गांधींच्या मारेक-यांची सुटका नको; मोदी सरकारने दाखल केली पुनर्विचार याचिका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सर्व मारेक-यांना मुक्त करण्याचे आदेश नुकतेच सुप्रीम कोर्टाने दिले होते. कोर्टाच्या या आदेशावर मोदी सकारने नाराजी व्यक्त केली असून कोर्टाच्या आदेशाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.

सुप्रीम कोर्टानं ११ नोव्हेंबर रोजी राजीव गांधी हत्याकांडातील सर्व सहा दोषींना मुक्त करण्याचे आदेश दिले होते. नुकतीच यांपैकी नलिनी श्रीहरन या महिलेची १२ नोव्हेंबर रोजी नुकतेच वेल्लोर जेलमधून सोडण्यात आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधून अनेकांचे आभार मानले आहेत. राजीव गांधींच्या हत्येप्रकरणी दोषी आढळलेले नलिनी श्रीहरन आणि पी रविचंद्रन यांची जेलमधून मुक्तता करण्याचे आदेश कोर्टाने दिले. न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने त्यांची वागणूक समाधानकारक असल्याने त्यांच्या शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्याआधीच त्यांची सुटका करण्याची परवानगी दिली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या