22.7 C
Latur
Wednesday, April 14, 2021
Homeराष्ट्रीयराजनाथ सिंह : फक्त 'मेक इन इंडिया' नव्हे 'मेक फॉर वर्ल्ड'चं लक्ष्य

राजनाथ सिंह : फक्त ‘मेक इन इंडिया’ नव्हे ‘मेक फॉर वर्ल्ड’चं लक्ष्य

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली, 27 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणानंतर देशाने आत्मनिर्भरतेच्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरुवात केली आहे. एनसीसी कॅडेट्सच्या ऑनलाइन प्रशिक्षणासाठी अॅप लॉन्च केल्यानंतर देशात स्वदेशी हत्यारांचे  उत्पादन करण्याची शक्यता आहे. एका वेब सेमिनारमध्ये संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, आम्ही चांगल्या पद्धतीने जगभरात योगदान देण्यासाठी आत्मनिर्भर होऊ इच्छितो…या मार्गाने जात असताना 101 संरक्षण वस्तू आयात करण्यावर प्रतिबंध लावण्यात आले आहे.

राजनाथ सिंह पुढे म्हणाले की, मला विश्वास आहे की आपल्या मदतकर्ते आणि सहकाऱ्यांच्या प्रयत्नांच्या माध्यमातून आपण केवळ मेक इन इंडियाचं नव्हे तर मेक फॉर वर्ल्ड मिळवू शकतो. या सेमिनारमध्ये संबोधित करताना चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी सांगितले की, आपल्याकडे उच्च क्षमता असलेल्या स्वदेशी हत्यारांचं उत्पादन करण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती आहे.

घर भाडं देऊ शकले नसल्याने जोडप्याने केली आत्महत्या

जनरल बिपिन रावत पुढे म्हणाले की, सशस्त्र सैन्य ही आत्मनिर्भर भारतासाठी चांगला संकल्प आहे. स्वत:च्या देशात तयार केलेल्या प्रक्रियेतून तयार केलेल्या हत्यारांतून युद्धात लढाई करीत जिंकण्यात जास्त सुख आहे, जो इतर वेळी मिळणार नाही.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,474FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या