24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रदुधाचा प्रतिकात्मक अभिषेक घालून राजू शेट्टी यांनी केली आंदोलनास सुरूवात

दुधाचा प्रतिकात्मक अभिषेक घालून राजू शेट्टी यांनी केली आंदोलनास सुरूवात

एकमत ऑनलाईन

शिरोळ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उदगाव ता. शिरोळ गावातील पुरातन शिवलिंग मंदिरात दुधाचा प्रतिकात्मक अभिषेक घालून आंदोलनास सुरूवात केली आहे. दुधाचे दर कमी झाल्याने आंदोलनाचा इशारा त्यांनी या आधी दिला होता. दुधाचे दर पडल्यामुळे राज्यातील शेतकरी अक्षरशः मेटाकुटीस आला आहे. दुधाला प्रतिलिटर ५ रूपयेचे तातडीचे अनुदान द्या, मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज (२१ जुलै) एक दिवसाचे राज्यव्यापी लाक्षणिक दूध बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटले होते.

कोल्हापूरमध्ये टँकर फोडले, बैलांना दुग्धाभिषेक

राज्यात पुन्हा एकदा दूध दर आंदोलनभडकले आहे. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना  आणि इतरही विविध संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. आक्रमक शेतकऱ्यांनी दूधाची वाहतूक करण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे काही ठिकाणी आक्रमक आंदोलकांनी दूधाचे टँकर फोडोले आहेत. काही ठिकाणी दुधाच्या गाड्या आडवून दूध रस्त्यवावर ओतले आहे. काही ठिकाणी बैलाला आणि दगडांना दुधाचा अभिषेक घालण्यात आला आहे. दरम्यान, दूध दरबाबत आज एक मंत्रिमंडळ बैठक पार पडत आहे. या बैठकीत राज्य सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्राप्त माहितीनुसार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, अकोला आदी जिल्ह्यांमद्ये आज सकाळपासूनच दूध दर वाढ करण्याबाबतच्या मागणीसाठी आंदोलन सुरु झाले आहे. दूध दर वाढ व्हावी. तसेच शेतकऱ्याला गायीच्या दूधासाठी थेट अनूदान मिळावे, दूध पावडर निर्यातीसाठी चालना देण्यात यावे. गायीच्या दूधासाठी 5 रुपये इतके अनुदान असावे अशी मागणी आंदोलकांचीआंदोलकांचे म्हणने आहे आजघडीला राज्यात दुधाला प्रतिलिटर 16 ते 20 रुपये दर मिळतो. हा दर अत्यल्प आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे हे नुकसान भरुन काढण्यासाठी सरकारने शेतकऱ्याला 5 रुपये इतके अनुदान द्यावे. यासोबतच शिल्लख राहिलेल्या दूधाची पावडर बनवून ती निर्यात करण्यासाठी चालना देण्या यावी, असेही हे आंदोलक सांगतात.

Read More  श्रीराममंदीर भूमिपूजन : राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्र्यांना तंबी !

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या