24 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयराजू श्रीवास्तव पुन्हा व्हेंटिलेटरवर

राजू श्रीवास्तव पुन्हा व्हेंटिलेटरवर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कॉमेडियन राजू श्रीवास्तवला हृदयविकाराचा झटका आल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. आता पुन्हा एकदा राजू श्रीवास्तवचा ताप वाढला आहे. त्यामुळे राजूला व्हेंटिलेटरवर टाकले आहे. राजूला व्हेंटिलेटरवरून न काढण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू श्रीवास्तव सध्या शुद्धीवर आहे. राजूच्या हात-पायांची हालचाल थोडी वाढली आहे. मंगळवारी त्याला काही काळ व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते. मात्र, आता पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. राजू श्रीवास्तव ८०-९० टक्के नैसर्गिक ऑक्सिजन स्वतः घेत आहे. त्याच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून आहेत.

२५ ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव शुद्धीवर आला होता. राजू श्रीवास्तवच्या हृदयाचे ठोके, बीपी आणि ऑक्सिजनची पातळी सामान्य आहे. राजू २३ दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल आहे. ९ ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव दिल्लीतील इरॉस हॉटेलमध्ये थांबला होता. तो हॉटेलच्या बाहेर जीममध्ये व्यायामासाठी गेला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या