बागपत : साध्वींचे लैंगिक शोषण व २ हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारा राम रहीम उत्तर प्रदेशच्या बागपत येथे बरनावा आश्रमात वास्तव्यास आहे. येथील एका ऑनलाइन सत्संगात त्याने थेट विज्ञानाला आव्हान दिले. राम रहीम म्हणाला की, डॉक्टरांच्या मते स्पर्म अर्थात शुक्राणू ओव्हरफ्लो होतात. मग मुलांचे का होत नाहीत? त्याने यासंबंधी शास्त्रज्ञांनी कोणता शोध लावला असा प्रश्नही केला.
राम रहीमला ब्रह्मचर्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. राम रहीम म्हणाला की ब्रह्मचर्य केवळ आत्मशक्तीने नियंत्रित करता येते. त्यामुळे आहाराच्या सवयींमध्ये बदल करावा लागेल. खूप गरम असलेल्या गोष्टी खाऊ नका. तुम्हाला त्रास देणा-या गोष्टी खाऊ नका. सात्विक अन्न खा. सेंद्रिय आहार घ्या.