26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeराष्ट्रीय‘राम सेतू’ने उडाला भडका अक्षय कुमारच्या अटकेची मागणी

‘राम सेतू’ने उडाला भडका अक्षय कुमारच्या अटकेची मागणी

एकमत ऑनलाईन

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ प्रदर्शित होण्याआधीच वादात पडला आहे. हा सिनेमा लवकरच कायद्याच्या कचाट्यात सापडेल असे वातावरण सध्या निर्माण झाले आहे. रामसेतू सिनेमाचा अभिनेता अक्षय कुमारविरोधात तक्रार दाखल केली जाऊ शकते.

भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी ही तक्रार करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांचा दावा आहे की, रामसेतू सिनेमात या राम सेतू मुद्द्याला खूप चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. त्यामुळे अक्षय कुमार विरोधात आपण कोर्टात केस दाखल करणार आहोत असे स्वत: सुब्रमण्यम स्वामी यांनी सांगितले आहे.

अक्षय कुमारचा राम सेतू सिनेमा २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे, सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे . काही दिवस आधीच निर्मात्यांनी सिनेमा प्रदर्शनाची तारीख देखील ठरवली. पण आता प्रदर्शना आधीच सिनेमा वादात पडल्याचे चित्र आहे. अक्षयचा रक्षाबंधन सिनेमा देखील प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. ११ ऑगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती दिली.

काय म्हणाले स्वामी…
आपल्या ट्विटमध्ये सुब्रमण्यम स्वामी यांनी लिहिले आहे, ही केस माझ्यातर्फे वकील सत्या सभ्रवाल लढवणार आहेत. मी अभिनेता अक्षय कुमार आणि कर्मा मीडियावर त्यांच्या राम सेतू सिनेमात चुकीचे मुद्दे दाखवले गेल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचा खटला दाखल करत आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या