26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयराम मंदिराची उभारणी होणार १८०० कोटी रुपयांत

राम मंदिराची उभारणी होणार १८०० कोटी रुपयांत

एकमत ऑनलाईन

अयोद्धा : अयोध्येत राम मंदिर उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. राम मंदिराच्या उभारणीसाठी १८०० कोटी रुपये खर्च झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मंदिराचे बांधकाम सुरू झाले तेव्हा त्याची किंमत ४०० कोटी होईल असा अंदाज होता. परंतु १८ महिन्यांनंतर ही किंमत जवळपास १८०० कोटींवर येऊ शकते असे बोलले जात आहे.

चंपत राय पुढे म्हणाले, राम मंदिराच्या उभारणीचा खर्च अंदाजित आहे. त्यात अजून सुधारणा होऊ शकते. रविवारी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची बैठक झाली यावेळी ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी ही माहिती दिली आहे. या बैठकीत रामजन्मभूमी संकुलात महान व्यक्ती आणि हिंदू धर्माशी संबंधित साधू-संतांच्या पुतळ्यांनाही स्थान देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. महर्षी वाल्मिकी, महर्षी विश्वामित्र आणि महर्षी अगस्त यांच्यासह निषादराज, माता शबरी आणि जटायू यांनाही पूजेसाठी स्थान देण्यासाठी चर्चा झाली आहे. ट्रस्टच्या नियमांवर विचार करण्यात आला असून अनेक सूचना देवून ही नियमावली अंतिम करण्यात आली आहे. या बैठकीत ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांच्यासह दहा विश्वस्त उपस्थित होते असेही चंपत राय यांनी स्पष्ट केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या