25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयरामदेव बाबा : कोरोनावर गुळवेल, अश्वगंधा यांचा वापर प्रभावी ठरतो

रामदेव बाबा : कोरोनावर गुळवेल, अश्वगंधा यांचा वापर प्रभावी ठरतो

एकमत ऑनलाईन

मुंबई: भारताने इटलीला कोरोना व्हायरसबाधित रुग्ण संख्येच्या क्रमवारीत मागे टाकले आहे. दिवसागणिक देशातील कोरोनानबाधितांची संख्या वेगाने वाढते आहे. दरम्यान, कोविड १९वरील उपचारासाठी सध्या कोणतेही औषध अथवा उपचार शक्य नाही. मात्र सरकार या भयानक महामारीमुळे प्रभावित झालेल्या रुग्णांवरील उपचारासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहे. आयुष मंत्रालय कोविड १९ विरुद्ध लढाईमध्ये आयुर्वेदिक औषधांचा वापर आणि त्यांचा प्रभाव यावर सोशल मीडियावर विविध पद्धती देत असते. योग गुरू रामदेव बाबा यांनी दावा केला आहे की कोरोनावर गुळवेल आणि अश्वगंधा यांचा वापर प्रभावी ठरतो. दरम्यान, सुरूवातीच्या स्तरावर याचे परीक्षण सुरू असून काही दिवसांतच गोष्टी स्पष्ट होतील. बाबा रामदेव यांचा हा उपचार कोरोनावर किती प्रभावी आहे हे पाहिल्यानंतरच जगभरात हा शोध सादर केला जाईल.

पतंजलिच्या संस्थापकांनी सांगितले की आयुर्वेदिक औषधांमध्ये व्हायरसवर उपचार करण्याची शक्ती आहे. आयुर्वेदिक औषध केवळ आजारांची लक्षणेच ठीक करणार नाहीतर याचे संक्रमणही रोखेल. आचार्य बालकृष्ण यांनीही दावा केला आहे की पतंजलि कोरोनावर औषध बनवण्यात यशस्वी ठरली आहे. त्यांनी दावा केला आहे की ा औषधामुळे कोरोनाचे हजारो रुग्ण बरे झाले आहेत. त्यांनी असा दावा केला की विविध ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह लोकांना हे औषध देण्यात आले त्यातील ८० टक्के रुग्ण बरे झाले.

Read More  राज ठाकरेंच्या 3 सुरक्षा रक्षकांना झाली करोनाची लागण

दुसरीकडे भारतीय औद्योगिक संस्था(आयआयटी)ने दिल्लीच्या शास्त्रज्ञांच्या एका समूहाने एआय़एसटी जपानच्या मदतीने हा शोध लावलाय की अश्वगंधामध्ये कोरोनाशी लढण्याची आणि उपचार करण्याची क्षमता आहे.

भारतात गेल्या २४ तासांत कोरोनाचे सर्वाधिक ९,९९६ प्रकरणे समोर आली आहेत. तर ३५७ लोकांचा मृत्यू झाला आहे. आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या २,८६, ५७९ इतकी झाली आहे. यात १,३७,४४८ प्रकरणे सक्रिय असून १,४१, ०२९ रुग्ण बरे झाले आहेत. यात ८,१०२ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही माहिती गुरूवार सकाळी दिली.

देशात एक जूननंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल ९० हजारांनी वाढली आहे. जगभरात कोरोनाने नुसता हाहाकार माजवला आहे. दरम्यान, यातच एक दिलासादायक बातमी म्हणजे कोरोनातून बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. देशात कोरोनामुक्त होण्याचा रेट ४९.२१ टक्के इतका आहे. देशात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा अधिकआहे. ११ जून पर्यंत देशात १,४१, ०२८ लोक बरे झाले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या