20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeराष्ट्रीययेस बँकेच्या राणा कपूर यांना जामीन मंजूर

येस बँकेच्या राणा कपूर यांना जामीन मंजूर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ईडीने ४६६.५१ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात त्यांना अटक केली होती.

राणा कपूर यांना पीएमएलए कायद्यांतर्गत ही अटक करण्यात आली होती. आता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. या आधी राणा कपूर यांना दिल्लीतील एका मालमत्तेच्या विक्रीसंबंधित फसवणुकीच्या प्रकरणात सशर्त जामीन मंजूर झाला होता. आता आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी जामीन मंजूर झाल्यामुळे तुरुंगातून बाहेर येण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.

येस बँकेशी संबंधित घोटाळ्यामुळे बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर यांना अटक करण्यात आली होती. त्यांनंतर त्यांच्या पत्नी ंिबदूसह दोन मुली रोशनी आणि राधा यांनाही अटक करण्यात आली होती. या प्रकरणी सीबीआयने राणा कपूर आणि अवंता ग्रुपचे प्रमोटर गौतम थापर यांच्यावर ४६६.५१ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या